गेल्या दहाबारा वर्षांपासून तरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ट्रेक घडून यावा असा - अगदीच दंडक नसला तरी - रिवाज म्हणून जो काय अंगवळणी पडला आहे तो यावर्षी पण पार पाडला गेला, त्याची गोष्ट.
३० तारखेला संध्याकाळी सहज म्हणून बेन्याला केलेला फोन कधी outing च्या प्लॅन मध्ये बदलला हे कळलं सुद्धा नाही. ३१ ची गर्दी टाळण्यासाठी वीकेंडची वाट न बघता आजचीच रात्र सत्कारणी लावायची ठरलं. खूप micro management न करता ऐन वेळी काय ते पाहून घेऊ म्हटलं. एकच tent. त्यामुळे जास्त सव्यापसव्य न करता जेवण करून निघालो. आटोपशीर सामान. मुख्य म्हणजे थंडीशी दोन हात करण्यासाठी जर्किन (चिलखत😛), हातमोजे, कानटोपी (शिरस्त्राण 😛), दोन जोडी socks (yeah, it works !) अशी युद्धपातळीवर तयारी झाली.
बाकी एक बॅटरी, दोन पाण्याच्या बाटल्या, तीन किलोचा tent आणि चार जण खातील एवढा एक डबा (😛)..!!
आपले अवाढव्य बाहू पसरून माळशेज घाटावर राज्य करून राहिलेला हरिश्चंद्रगड वर्षभरात तीनचार वेळा तरी आमंत्रण घेऊनच येतो.
..आणि जमेल तितक्या वेळा त्याच्या हाकेला ओ देण्यासाठी तत्पर असलेले आम्ही.
नेहमी दिवसा जातो त्या रस्त्याने रात्री जाताना अद्भुत वाटत होत. रंगीबेरंगी लायटिंग लाऊन नवे, जुने, (काही तर बंद पडलेले पण) ढाबे चमचम करत होते. वर्षाला (impress करायला 😛..) निरोप द्यायला!
थंडीने आपली शस्त्र म्यान करून आमची पार निराशा करून टाकलेली. वाळवंटातून जाणाऱ्या सांताक्लॉज सारखे winterwear चा भार घेऊन आम्ही चाललो. थंडीच नाही तर चहा काय कामाचा म्हणून "पुढे घेऊ, पुढे घेऊ" असा करत बेन्याला मी चहा पण पिऊ दिला नाही 😛.
Royal Enfield Meteor वर आपले ड्रायव्हिंग चे skills दाखवत बेन्याने साडे दहा वाजता पर्यंत घाट पार केला. नागेश्वरमहादेव मंदिरात मुक्काम करण्याचा बेत होता पण रस्त्यात पाण्याच्या काठावर एक देऊळ लागलं. इथली नीरव शांतता, पाण्यावर मिणमिण करणारे दूरचे दिवे, आणि "नाव उलटली माव हरपली चंदेरी दर्यात" ची आठवण करून देणार ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहून "इथेच टाका तंबू" म्हणण्याचा मोह आम्हाला आवरला नाही.
देऊळ अगदी साधं. पत्र्याची शेड बाजूला. पूर्वेला अथांग जलाशय. मग रस्ता आणि पश्चिमेला अस्ताला जाणारा चंद्र. तिथलीच जागा थोडी साफसूफ करून tent उभारला आणि बाहेरच रस्त्यावर निवांत बसलो.
शेवटी अचानक का होईना पण वर्षाअखेर कुठे तरी फिरायला जाण्याची परंपरा याही वर्षी अबाधित राहिली म्हणून आनंद वाटला. लगेच status update करून कोणाला views जास्त यावर आमची एक टेस्ट मॅच झाली. त्यात माझा डावाने पराभव झाला.. 😂असो..
सात वर्षांपूर्वी याच ठिकाणी हिवाळ्यात मुक्कामी आलेलो याची आठवण होतीच. मग काय त्यावेळी असलेल्या सर्वांना फोन करून जागे करण्याची हुक्की आली. @योगेश सोडून कोणी call उचलला नाही.

विनायकने जेवणाचा डबा उघडला. झणझणीत रस्सा (use your imagination), कांदा, टोमॅटो, लिंबू, भाकरी. रस्त्यावरच एका कडेला बसलो. जेवणासोबत गप्पा चालूच होत्या. विषयांना तोटा नाही. अध्यात्म, खगोलशास्त्र, रातकिड्यांच्या आवाजांचे प्रकार, पुण्यात पर्वती वर ऐकू येणारी नवरा बायकोची भांडणं.. शेअर मार्केट.. reels चा सुकाळ.. पाण्यावरून दिसणारे लाईट्स इतर लाईट्स पेक्षा जास्त का लुकलुकतात, असं बरंच काही..
चंद्र अर्ध्या कापलेल्या पांढऱ्या शुभ्र कलिंगड सारखा तरंगत होता. हळू हळू खाली जात लाल होत तो निघून गेला. जाता जाता त्याने एकदा तळ्यात वाकून प्रतिबिंब पाहिले. ते पाहून आम्हीही हरखलो. अधून मधून तारे तुटत होते. RE Meteor वर Meteor shower! जेवण संपवून शतपावली सुरू केली आणि त्याच बरोबर सुरू झाले आमचे astro photography चे प्रयोग! काही फसले (actually बरेचसे फसले 😛), काही जमले.. सिंदोळा, रोहिदास आणि तारामती शिखर यांच्या पार्श्वभूमीवर दिसणारं निरभ्र चमचमतं आकाश.. काही वर्षांपूर्वी कमी असणारे दिवे आता पाण्याच्या एका बाजूला सर्वदूर पसरलेले. कदाचित त्यामुळेच आकाशगंगा दिसली नाही.
हळू हळू वाहनांची वर्दळ मंदावली.. क्वचित एखादे पाणबदक सूर मारताना आवाज करे.. पिवळ्या, लाल, हिरव्या दिव्यांच्या पाण्यात खोल खोल जाणाऱ्या उभ्या रेषा..
अस्ताला जाणाऱ्या चंद्राने उजेड सोबत नेला आणि कदाचित ऊब सुद्धा.. हवेतला गारठा वाढला.. काजळकाळ्या डोंगरांच्या कडा पाण्यात विरघळून जात आहेत अश्या दिसू लागल्या. अंधाराची जागा हळू हळू धुक्याने घेतली.. आपल्याला स्थळ काळाशी बांधून ठेवणाऱ्या जाणीवा अशा वेळी धूसर होत जातात.. अंधारात बुडालेला भवताल.. भासांचे मृगजळ वेढून राहिलेले..

रात्रीचे तीन वाजत आलेले.. समोरच्या पाण्यावरून चोरपावलांनी आलेली झोप आपसूकच तंबूत घेऊन गेली.
मग नंतर केव्हातरी थंडीपण आत शिरली. पहाटे बाईकच्या आवाजाने जाग आली. मासे पकडण्यासठी आलेल्या नावाड्याने गाडी तिथे खालच्या बाजूला ठेवून होडी पाण्यात लोटली.
क्षितिजाच्या एका बाजूला जांभळट लाल छटा दिसू लागल्या आणि पाण्यावरून उगवणारा सूर्योदय पाहायला आम्ही थंडीला न जुमानता उठून काठावर येऊन बसलो..
अंधार निवळत चाललेला.. रात्रभर काळे मुखवटे घालून उभे असलेले एक एक डोंगर आपले चेहरे दाखवू लागले.. गार.. शांत पाणी.. इतकं शांत की काठावरच्या डोंगरांच्या अंगावरची एक न् एक रेष पाण्यावर दिसावी.. एक भलामोठा आरसा इथून तिथून पसरलेला. पाण्याखालचं जग खरं वाटावं. Parallel realities...

![]() |
![]() |
रोहिदास शिखर |

त्या alternate reality ला स्पर्श करण्याची ओढ अनावर होऊन आपण हो नाही म्हणता पाण्यात पाय टाकतो.. एक थंडगार शिरशिरी अंगभर पसरते.. आपल्या उभं राहण्याने पाण्यावर गोलाकार उमटत जाणारी वलयं.. आरसा हेलकावतो.. आपली नजर जात नाही तिथवर उमटत जाणाऱ्या लाटा. पाणी घेऊन जातं दूर दूर आपल्या स्पर्शाच्या खुणा.. एवढ्या मोठ्या पसाऱ्याने आपल्या ठिपक्याएवढ्या अस्तित्वाला दाद द्यावी या जाणिवेने आपण सुखावतो..
अचानक डोंगराच्या एका कडेवरून सूर्य डोकवला आणि क्षणार्धात आपल्या पुढ्यातल्या गवतापासून ते थेट तारामती शिखरापर्यंतचा परिसर लालसर सोनेरी रंगात उजळून निघाला.. उजळत्या तेजाला आपसूकच दोन्ही हातांनी अर्घ्य दिलं गेलं..
वर्षातला शेवटचा सूर्योदय.. रोजच्या इतकाच तेजस्वी, देदीप्यमान.. End is the beginning चा नवा अर्थ सांगत असल्यासारखा तो दिमाखात वर वर येऊ लागला..
रात्रभर ताऱ्यांच्या छताखाली गारठलेलं देऊळ उन्हात झिलईदार दिसू लागलं.

Comments
Post a Comment