माथेरान


⦿

पावलांस बिलगे जेव्हा
सांजेची गोरज धूळ,
पाचोळा सोडून मागे
जायचे, समांतर दूर


वळणाच्या आडून पाही
पोपटी नवी नवलाई,
हे माथ्यावरचे रान
मग चालत येते पायी


ही भुलावणारी वाट
जगण्याशी जाऊन मिळते,
मग गुपित मलाही त्याचे
थोडेसे तेव्हा कळते..

⦿

© प्रशांत
२ मे २०२२

Comments